Ola कडून Used Cars बिझिनेस बंद, ओला डॅश व्यवसायालाही ठोकले टाळे, EV वर लक्ष केंद्रित करणार

Ola कडून Used Cars बिझिनेस बंद, ओला डॅश व्यवसायालाही ठोकले टाळे, EV वर लक्ष केंद्रित करणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

ओलाने आतापर्यंत ओला कॅफे, फूड पांडा, ओला फूड्स आणि आता ओला डॅश व्यवसाय बंद केले आहेत.

ओलाने आपल्या वापरलेल्या वाहनांचा व्यवसाय ओला कार्स (Ola Cars) तसेच ओला डॅश (Ola Dash) हा आपला क्विक-कॉमर्स व्यवसाय बंद केला आहे. कंपनीने लॉन्च केल्याच्या एका वर्षाच्या आत ओला कार बंद केल्या, कारण कंपनी आपल्या इलेक्ट्रिक टू-व्हिलर आणि कार व्हर्टिकलवर लक्ष केंद्रित करत आहे. ओलाने आतापर्यंत ओला कॅफे, फूड पांडा, ओला फूड्स आणि आता ओला डॅश व्यवसाय बंद केले आहेत. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा प्रतिस्पर्धी 10-15 मिनिटांच्या किराणा डिलिव्हरी मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करत आहेत. 
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'ओलाने आपल्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन केले आहे आणि ओला इलेक्ट्रिकसाठी बाजारपेठेतील प्रवेश धोरण मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून ओला डॅशने आपला क्विक कॉमर्स व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला आपल्या ओला कार व्यवसायाची पुनर्रचना करेल.' याचबरोबर, ओला इलेक्ट्रिकचे विक्री आणि सेवा नेटवर्क वाढविण्यासाठी ओला कारची पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि क्षमता पुन्हा तयार केली जाईल. ओलाचे आता इलेक्ट्रिक कार, सेल मॅन्युफॅक्चरिंग आणि वित्तीय सेवा व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
झोमॅटोने शुक्रवारी क्विक-कॉमर्स किराणा वितरण प्लॅटफॉर्म ब्लिंकिट विकत घेण्यासाठी 4,447 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. डिसेंबर 2021 मध्ये स्विगीने इन्सामार्टमध्ये 700 मिलियन डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा केली. गेल्या महिन्यात 10 मिनिटांच्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म जेप्टोने 200 मिलियन डॉलर जमा केले आणि त्याचे मूल्य जवळपास 900 मिलियन डॉलर इतके झाले. ओकिनावा ऑटोटेक, प्युअर ईव्ही, जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि बूम मोटर्स सारख्या इतर ईव्ही वाहनांमध्ये ओला इलेक्ट्रिकला आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींमधील सदोष बॅटरीसाठी सरकारकडून तपासणीचा सामना करावा लागत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Ola कडून Used Cars बिझिनेस बंद, ओला डॅश व्यवसायालाही ठोकले टाळे, EV वर लक्ष केंद्रित करणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm