चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक; पोलिसांवर हल्ल्याचा होता कट

चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक;
पोलिसांवर हल्ल्याचा होता कट

belgavkar.com | belgaum | belgavkar

एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 जिवंत काडतुसं जप्त

श्रीनगर : सुरक्षा दलांसोबत संयुक्त कारवाई करून एका दहशतवाद्याला अटक करण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांना यश आलंय. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव फरीद अहमद असं असून तो डोडा भागातील रहिवासी आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, डोडामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या ताब्यातून एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. शिवाय, दहशतवाद्याकडून एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांवर हल्ल्याचा कट? डोडामधील दहशतवाद्याच्या अटकेबाबत GreaterKashmir.com च्या वृत्तात पोलीस प्रवक्त्याचा हवाला देत म्हटलंय की, दहशतवादी सीमेपलीकडं राहणाऱ्या दहशतवादी कमांडरच्या संपर्कात होता. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव फरीद अहमद असं असल्याचं या बातमीत म्हटलंय. फरीद जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना लक्ष्य करू पाहत होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोडा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलाय.
यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. 21 जून रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एका उपनिरीक्षकाच्या हत्येत सामील होता. चकमकीबाबत एसएसपी जेलानी वाणी यांनी सांगितलं की, जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांची हत्या करणारा दहशतवादी माजिद पंपोर भागातील रहिवासी होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक; पोलिसांवर हल्ल्याचा होता कट
एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 जिवंत काडतुसं जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm