बेळगाव : महामार्गावरील होनगा येथे अपघातात ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वेगाने येणाऱ्या मोटारीने रस्त्याकडेला थांबलेल्या एकाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो ठार झाला. शनिवारी सायंकाळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील होनगा येथे हा अपघात घडला. महादेव परशराम कलाल (वय 53, रा. यमकनमर्डी ता. हुक्केरी) असे त्याचे नाव असून अपघाताची नोंद काकती पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी मोटारचालक तेजस भालचंद्र पाटील (रा. कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
महादेव कलाल हे काल सायंकाळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग होनगा येथे रस्त्याकडेला थांबले होते. संकेश्वरहून बेळगावकडे येणाऱ्या मोटारीने (एमएच 09 EK 2228) त्यांना जोरदार धडक दिली. या वेळी झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.