बेळगाव : वीजवाहिनीचा स्पर्श, बालिका ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गोकाक तालुक्यातील हुलीकट्टी येथे तुटून पडलेल्या वीजवाहिनीवर पाय पडल्यामुळे आठ वर्षांची बालिका जागीच ठार झाली. चुनव्वा हनुमंत सरवी (वय 8) असे मृत बालिकेचे आहे. तिचे मूळ गाव सौंदत्ती तालुक्यातील कुटरनट्टी असून आईचे माहेरी आजीकडे हुल्लीकट्टी येथे ती राहत होती. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.