belgaum-one-and-a-half-quintals-of-narcotics-destroyed-belgaum-202206.jpg | बेळगाव : दीड क्विंटल अमली पदार्थ केले नष्ट | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : दीड क्विंटल अमली पदार्थ केले नष्ट

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला दीड क्विंटलहून अधिक गांजा व इतर अमली पदार्थ रविवारी नष्ट करण्यात आले. सौंदत्ती तालुक्यातील हारुगोप्प जवळील एका कारखान्यात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली. जिल्हा व शहर पोलिसांनी अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई केली.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार, रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी, मुरुगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश माळी पाटील आदी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत 7 लाख 78 हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात 43 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला 117 किलो 399 ग्रॅम गांजा दि बेलगाम ग्रीन एनव्हिरॉनमेंटल मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कारखान्यात चिमणीत घालून तो नष्ट करण्यात आला. न्यायालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीने अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.