belgaum-dedication-ceremony-of-gandhi-bhavan-at-piranwadi-belgaum-202206.jpg | बेळगाव : पिरनवाडीतील ‘गांधीभवन’ | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : पिरनवाडीतील ‘गांधीभवन’

belgavkar.com | belgaum | belgavkar

पिरनवाडी येथील निसर्गरम्य परिसरात दोन एकर जागेवर हे गांधी भवन

बेळगाव : माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने पिरनवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या गांधी भवनचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार 27 जून रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते होणार आहे. पिरनवाडी येथील निसर्गरम्य परिसरात दोन एकर जागेवर बेळगावच्या निर्मिती केंद्राच्यावतीने हे गांधी भवन उभारण्यात आले आहे. यासाठी तीन कोटी खर्च करण्यात आला असून ध्यान-प्रार्थनेसाठी शंभरहून अधिक लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गांधीजींचे संघर्षमय जीवन, अहिंसेचा संदेश यासह विविध पैलूंचा डिजिटल माध्यमांतून परिचय करून देण्यात आला आहे.
महात्मा गांधीजींच्या सर्वसमावेशक जीवनावर प्रकाश टाकणारी पुस्तके आणि संशोधन साहित्य लोकांना वाचता यावे व सहज उपलब्ध व्हावे यासाठी या भवनात मिनी ग्रंथालयही उभारले गेले आहे. गांधी भवनाबाहेर महात्मा गांधीजींची एक ध्यानधारण केलेली मूर्ती स्थापित केली असून प्रवेशद्वारासमोर आणखी एक पितळी मूर्ती बसविली आहे. तसेच परिसरात दुसर्‍या बाजूला गांधीजींच्या नेतृत्वाखाली काढलेल्या दांडी यात्रेचे दृश्य दाखविले आहे. तसेच आकर्षक फलकही उभारण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क विभाग प्रत्येक जिल्हय़ात गांधी भवन स्थापन करून म. गांधींच्या जीवन-कार्याची माहिती देण्याचा उपक्रम सुरू ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरातील जिल्हा केंद्रांमध्ये असे भवन उभारण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी अलीकडेच दावणगेरे जिल्ह्यात गांधी भवनचे उद्घाटन केले होते. तसेच बळ्ळारी, धारवाड आणि इतर जिल्ह्यांमध्ये गांधी भवन उभारले आहे.