फक्त चार शब्दांचा राजीनामा… नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया…

फक्त चार शब्दांचा राजीनामा… नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया…

belgavkar.com | belgaum | belgavkar

यूट्यूब इंडियाने एक गंमतीशीर राजीनामा शेअर केला आहे. यातील मजकूर वाचून नेटकऱ्यांची हसूहसून पुरेवाट लागली आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा राजीनामा फक्त दोन ओळींचा असून त्यात फक्त चार शब्द आहेत. त्यामुळे हा गंमतीचा विषय ठरत आहे. हा राजीनामा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा राजीनामा यूट्यूब इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. ‘याच्याशी ज्यांचा संबंध आहे, चला संपवूया’ असा या राजीनाम्याचा मजकूर आहे. फक्त दोन ओळी आणि चार शब्द ‘ चलिये खत्म करते है’ या चार ओळींमुळे हा राजीनाम्याची चर्चा होत आहे.
या चार शब्दांच्या राजीनाम्यावर अनेक गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. अशाच प्रकारचा राजीनामा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याला प्रतिक्रिया देताना बजाज कॅपिटलनेही गंमतीशीर राजीनामा शेअर केला आहे. त्यात लिहिले आहे की, ‘मेरी निंद, मेरा चैन मुझे लौटा दो, वरना मेरा हो गया’ यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी असे गंमतीशीर राजीनामे शेअर केले आहेत. तसेच यावर अनेक गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही युजर्सने विचारले आहे की, हा राजीनामा अखेर आहे कोणाचा, असा प्रश्नही एकाने विचारला आहे. अशा प्रकारचा राजीनामा देणे सोपे आहे, मात्र, तो कोणा स्वीकारणार नाही, असे एका युजरचे म्हणणे आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

फक्त चार शब्दांचा राजीनामा… नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया…

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm