बेळगाव : 117 किलो अमली पदार्थ करणार नष्ट : जिल्हा पोलिसप्रमुख

बेळगाव : 117 किलो अमली पदार्थ करणार नष्ट : जिल्हा पोलिसप्रमुख

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव जिल्हा पोलिसप्रमुखांच्या व्याप्‍तीत विविध प्रकणात जप्‍त करण्यात आलेल्या 117 किलो अमली पदार्थांचा विल्हेवाट लावण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकाव्दारे कळविली आहे. जिल्ह्यामध्ये विविध पोलिस स्थानकांच्या व्याप्‍तीत बेकायदेशीरपणे उत्पादन घेण्यात आलेल्या गांजा, तसेच बेकायदेशीर विक्री करताना जप्‍त करण्यात आलेले अमली पदार्थ पोलिसांकडून जप्‍त करण्यात आले होते. अशा प्रकारे विविध पोलिस स्थानकात नोंद झालेल्या 43 प्रकरणातून 7 लाख 78 हजार किंमतीचा 117 किलो 399 ग्रॅम अमली पदार्थ जप्‍त करण्यात आला होता.
सदर जप्‍त करण्यात आलेले अमली पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात येणार आहे. सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड जवळील हारगोप्प येथील ग्रीन एन्वीरानमेंटल मॅनेजमेंट प्रा. लि. येथे अमली पदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात येणार असल्याचे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 117 किलो अमली पदार्थ करणार नष्ट : जिल्हा पोलिसप्रमुख

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm