सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू;

सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू;

belgavkar.com | belgaum | belgavkar

सिंहगडावरच्या कल्याण दरवाज्याजवळ असलेल्या पायवाटेवरची दुर्दैवी घटना

पुणे : सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळली आहे. दाट धुके असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चार ते पाच ट्रेकर्स थोडक्यात बचावले आहेत. कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ शनिवारी दरड कोसळण्याची घटना घडली. कोसळलेल्या दरडखाली चिरडून पुण्यातील 31 वर्षांचा गिर्यारोहक हेमंत धिरज गाला याचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमंत गाला पुण्यातील मित्र मंडळ चौक इथं राहाणारा होता. शनिवारी मध्यरात्री स्थानिक कार्यकर्त्यांनी घनदाट जंगलातील दिडशे फूट खोल दरीत उतरून दोराच्या साह्याने हेमंतचा मुत्युदेह बाहेर काढला.
tragic-death-of-a-mountaineer-in-pune-after-being-crushed-under-the-shores-of-sinhagad-pune-202206-pune.jpeg | सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू; | belgaum news | belgavkar बेळगावकर
हेमंतच्या दुर्दैवी मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. हेमंत कुटुंबातला एकलुता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे. हेमंत याला ट्रेकिंग, गिर्यारोहणाची लहानपणापासून आवड होती. निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने राज्यातील गडकोट, सुळके, दुर्गम किल्ले सर केले. हिमालयातही त्याने ट्रेकिंग केलं होतं. ट्रेकिंग स्पर्धेत त्याने मोठं यश मिळवलं होतं.
सकाळी सहा वाजता 'सिंहगड एथिक्स ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. सिंहगड पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी-गोळेवाडी चौक-कोंढणपूरफाटा-कोंढणपूर- कल्याण-कल्याण दरवाजा-नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी -पुणे दरवाजा-गाडीतळ-आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग होता. स्पर्धकांना रस्त्याची माहीती देण्यासाठी जागोजागी सुमारे पन्नास स्वयंसेवक उभे होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच स्पर्धक कल्याण दरवाजाजवळ पोहचले आणि अवघ्या पाच मिनिटांत मागे दरड कोसळली. कल्याण दरवाजापासून काही अंतरावर खाली उभे असलेल्या नरेश मावानी, संतोश शेळके, हेमंत कांचन व इतर दोन स्वयंसेवकांनी दरड कोसतानाची घटना प्रत्यक्ष पाहिली व खालून येणाऱ्या स्पर्धकांना याची माहिती देत त्यांना दुसऱ्या पायवाटेने गडावर सुखरूप पोहोचवले. तसेच इतर नागरीकांनाही याबाबत माहिती दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू;
सिंहगडावरच्या कल्याण दरवाज्याजवळ असलेल्या पायवाटेवरची दुर्दैवी घटना

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm