बेळगाव : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भरधाव कंटेनरची मोटारसायकलला धडक बसल्याने एकजण ठार झाला. हा अपघात मुत्नाळ (ता. बेळगाव) येथील होईनहळ्ळा पुलाजवळ शुक्रवारी घडला. अपघाताची नोंद हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे. किरण अप्पय्या हिरेमठ (वय 24, हौसकुरगुंद ता. बैलहोंगल) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मोटरसायकलवरून एम. के. हुबळीकडे जात होता. त्यावेळी कंटेनरची धडक बसून हा अपघात झाला.
कंटेनरचालक मौळेश रामाप्पा रानोजी (रा. एम. के. हुबळी) याच्यावर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm