कर्नाटक : कारवारमध्ये 4 पर्यटक समुद्रात बुडाले

कर्नाटक : कारवारमध्ये 4 पर्यटक समुद्रात बुडाले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बाड समुद्र किनार्‍यावर 4 पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे

कर्नाटक - कारवार : जिल्ह्यातील कुमठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाड समुद्र किनार्‍यावर शनिवारी 4 पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी दोन पर्यटकांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर अन्य दोन पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे. चैतश्री (22) आणि अर्जुन (23) यांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर समुद्रात बुडालेल्या किरणकुमार (27) आणि तेजस (22) यांचा शोध घेण्यात येत आहे. बेंगळूर येथील खासगी कंपनीत सेवा बजावणारे काही कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कुमठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाड येथील समुद्र किनार्‍यावर शनिवारी दाखल झाले होते. पर्यटकांची एकूण संख्या 89 इतकी होती. किनार्‍यावर पर्यटनाचा आनंद लुटताना काही पर्यटकांना अरबी समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे काही पर्यटक समुद्रात उतरून लाटांच्या विळख्यात सापडले.
तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना समुद्रात न उतरण्याचा सल्ला दिला होता. पर्यटक समुद्रात गटांगळ्या खात आहेत हे लक्षात येताच वकील गणेश नाईक, गुरुनंद नाईकसह अन्य काही स्थानिकांनी समुद्रात उडी घेऊन काही पर्यटकांना वाचविले. तथापि ते चैतश्री, अर्जुन, किरणकुमार आणि तेजस यांना वाचवू शकले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच किनारपट्टी रक्षक दलाचे आणि कुमठा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. गंभीर अवस्थेत चैतश्री हिला उपचारासाठी रुग्णालयाकडे नेताना तिचा मृत्यू झाला आणि अर्जुन याचा मृतदेह आढळून आला. समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या किरणकुमार आणि तेजस यांचा शोध घेण्यात येत आहे. किनारपट्टी रक्षक दल आणि कुमठा पोलिसांनी शोधकार्य सुरू ठेवले आहे. कुमठा पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : कारवारमध्ये 4 पर्यटक समुद्रात बुडाले
बाड समुद्र किनार्‍यावर 4 पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm