बेळगाव : कोल्हापूर सर्कलजवळ अपघातात महिलेचा मृत्यू

बेळगाव : कोल्हापूर सर्कलजवळ अपघातात महिलेचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. कोल्हापूर सर्कल युके-27 हॉटेल जवळ झालेल्या या घटनेत महिला शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रेणुका भातकांडे (वय 31) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून सदर महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. रेणुका स्कुटीवरून जात असते वेळी टँकरला त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले.
मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शनिवारी पूर्ण दिवस शाळा ठेवण्याची सूचना सरकारने केली होती. त्यानुसार शिक्षिका आपली सेवा बजावून घरी निघाली होती, त्यावेळी हा अपघात घडल्याचे समजते. गेल्या काही महिन्यांपूर्वी रेणुका यांच्या पतीचे निधन झाले होते , आता त्यांचेही निधन झाल्याने त्यांच्या पश्चात असलेली दोन लहान मुले पोरकी झाली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कोल्हापूर सर्कलजवळ अपघातात महिलेचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm