बेळगाव : बळ्ळारी नाल्यात क्रूझर पलटी, भीषण अपघातात 7 ठार

बेळगाव : बळ्ळारी नाल्यात क्रूझर पलटी, भीषण अपघातात 7 ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर बळळारी नाल्यात पलटी झाल्याने 7 जण ठार 9 जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कल्याळ ब्रिजजवळ घडली आहे. रविवारी सकाळी आठच्या दरम्यान हा अपघात घडला. कामगार क्रूझर मधून बेळगावकडे कामासाठी येत होते. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सर्व मयत हे गोकाक तालुक्यातील असून क्रूझर मधून 18 कामगार कामांसाठी हे बेळगावकडे येत होते. जखमींना उपचारासाठी बेळगावातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
belgaum-seven-labour-death-cruizer-fall-nala-accident-gokak-202206.jpg | बेळगाव : बळ्ळारी नाल्यात क्रूझर पलटी, भीषण अपघातात 7 ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर
अपघात होताच तात्काळ याची माहिती मारिहाळ पोलीसांना देण्यात आलीत्यानंतर क्रूझर मध्ये अडकलेल्या जखमींसह मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. क्रूझर इतक्या वेगात होती की तीन ते चारवेळा पलटी झाली. सांबरा रेल्वे स्टेशनच्या कामाकरिता हे कामगार गोकाक कडून बेळगावला येत होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सर्व मयत अक्कतंगेरहाळ (गोकाक) : अडव्यापा चिलभावी (27), बसवराज दळवी (30), बसवराज हनमंण्णावर( 51), आकाश गस्ती (22), सर्व दासनट्टी (गोकाक) फकिरप्पा हरीजन( 55), मल्लाप्पा दासनट्टी(30), मल्लापूर एसए बसवराज सनदी (35)

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बळ्ळारी नाल्यात क्रूझर पलटी, भीषण अपघातात 7 ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm