150 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत, लष्करी अधिकाऱ्याचा दावा

belgavkar.com | belgaum | belgavkar

मानसेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे नियंत्रण रेषेजवळ दहशतवादाचे प्रशिक्षण

सुमारे 150 दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या वेगवेगळ्या लॉन्चिंग पॅडवर जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. तर सुमारे 500 ते 700 दहशतवादी 11 प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. एलओसी ओलांडून काश्नीर खोऱ्यात घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.  
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिनुसार, “मानसेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या 11 प्रशिक्षण शिबिरांमध्ये 500 ते 700 लोक दहशतवादाचे प्रशिक्षण घेत आहेत.   शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 150 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत  आहेत. “दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याची शक्यता आहे, परंतु अलीकडच्या काळात ज्या प्रकारे आम्ही एक मजबूत सुरक्षा भिंत बांधली आहे. शिवाय ज्या प्रकारे पाळत ठेवणारी उपकरणे तैनात केली आहेत, त्यामुळे घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. दहशतवादी आता दक्षिण पीर पंजालमध्ये राजौरी-पुंछ मार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर मार्गांच्या तुलनेत काश्मीर खोऱ्यात कमी घुसखोरी झाली आहे,' असी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. 
'गेल्या पावणे दोन महिन्यात 50 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व प्रकारे पावले उचलली जात आहेत. त्यामुळे दहशवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न आम्ही हानून पाडू, असा विश्वास लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केला. दरम्यान, गेल्या काही काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झालीय. परंतु, सुरक्षा दलांकडून देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले जात आहे. आज शोपियांच्या हेफ शिरमलमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या भागात सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर ही चकमक सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चकमक सुरू असून दोन्ही बाजूंनी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

150 दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत, लष्करी अधिकाऱ्याचा दावा
मानसेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे नियंत्रण रेषेजवळ दहशतवादाचे प्रशिक्षण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm