बेळगाव शहरांतर्गत आणि नजीकच्या काही गावांमध्ये धावणार्‍या बसच्या तिकीट दरात कपात

belgavkar.com | belgaum | belgavkar

पहिल्या स्टेजसाठी आता 5 रुपये, दुसर्‍या स्टेजसाठी आता 10 रुपये

बेळगाव : बेळगाव शहरांतर्गत आणि नजीकच्या काही गावांमध्ये धावणार्‍या बसच्या तिकीट दरात परिवहन महामंडळाने कपात केली आहे. मात्र, ग्रामीण भागाच्या बससेवेचे दर जैसे थे आहेत. त्यामुळे ग्रामीण प्रवाशांच्या बाबतीत परिवहनने पक्षपात केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरांतर्गत पहिल्या स्टेजसाठी एक रूपया तर दुसर्‍या स्टेजसाठी दोन रूपये तिकीट दरात कपात केली आहे. मात्र ग्रामीण भागात धावणार्‍या बसचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
शुक्रवारपासून नवीन तिकीट दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शिवाय बसवाहक आणि प्रवाशांची चिल्लर पैशांसाठी होणारी दैनंदिन कटकटही थांबली आहे. पहिल्या स्टेजसाठी 6 रुपये तिकीट दर होता. तो आता 5 रुपये करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसर्‍या स्टेजसाठी 12 रुपये तिकीट दर होता. तो आता 10 रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भाग व लांब पल्ल्याच्या बस तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरांतर्गत आणि नजीकच्या काही गावांमध्ये धावणार्‍या बसच्या तिकीट दरात कपात
पहिल्या स्टेजसाठी आता 5 रुपये, दुसर्‍या स्टेजसाठी आता 10 रुपये

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm