बेळगाव शहरात धावणार इलेक्ट्रिक बस

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : प्रदूषण टाळून खर्चाची बचत करण्यासाठी परिवहन मंडळाने इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी बस धावत आहेत. या बसना प्रवाशांची पसंती मिळाल्यास लवकरच बेळगावातदेखील इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. त्यामुळे डिझेलची बचत होणार आहे.
यापूर्वी परिवहनच्या ताब्यात 360 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. मात्र काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने इलेक्ट्रिक बससमोर अडचणी वाढत आहेत. येत्या काळात चार्जिंग स्टेशनची उभारणी झाल्यानंतर सर्वत्र इलेक्ट्रिक बस दिसणार आहेत. कोरोनाकाळात परिवहनला प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागला. दरम्यान डिझेलसह दुरुस्तीच्या खर्चाचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक बस परिवहनला आधार ठरणार आहे. राज्य सरकार खासगी कंपनीकडून राज्यात इलेक्ट्रिक बसची योजना राबविणार आहे. दरम्यान या बसला प्रतिसाद वाढल्यास विविध मार्गांवर इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात धावणार इलेक्ट्रिक बस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm