Belgaum-Another-arrested-in-murder-case-goundwad-belgaum-202206.jpg | बेळगाव : खूनप्रकरणी आणखी एकाला अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

जाळपोळप्रकरणी आणखी दोघांना अटक

खूनप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक तर जाळपोळप्रकरणी आतापर्यंत 21 जणांना अटक

बेळगाव : गौंडवाड येथे तरुणाच्या खुनानंतर जाळपोळ व काही जणांवर हल्ले झाले. शनिवारी रात्री 9 वा. ही घटना घडली. यामध्ये सतीश राजेंद्र पाटील (वय 40, रा. भैरवानथ गल्ली) या तरुणाचा हकनाक बळी गेला. गौंडवाड येथे झालेल्या सतीश पाटील या तरुणाच्या खूनप्रकरणी गुरुवारी काकती पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. यापूर्वी दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. महांतेश जयाप्पा निलजकर (वय 23, रा. होळी गल्ली, गौंडवाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. भैरवनाथ देवस्थानासमोर पार्क करण्यात आलेली मोटार काढण्यास सांगितल्याने शनिवारी रात्री सतीश पाटील या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. त्यामुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण होऊन दहाहून अधिक वाहनांची जाळपोळ निलजकर करण्यासह घरांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात खून आणि तोडफोडप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांनी त्या दिवशी सतीश पाटील याच्या खून प्रकरणी 7 जणांना अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी काकती पोलिसांनी आणखी तिघा संशयित महिलांना अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी महांतेश या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर जाळपोळ आणि दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी 19 जणांना अटक केली होती. बुधवारी काकती पोलिसांनी आणखी दोघा संशयितांना अटक केली आहे. गंगाराम यल्लाप्पा पाटील आणि नंदू यल्लाप्पा पाटील (दोघेही रा. गौंडवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या 21 वर पोहोचली आहे.
काकती पोलिसांनी मंगळवारी लक्ष्मी व्यंकटेश कुट्रे (45), संगीता संजय कुट्रे (45) व शशिकला ऊर्फ अनिता आनंद कुट्रे या तीन महिलांनाही अटक केली. या प्रकरणात आणखी पाचहून अधिक जणांचा समावेश आहे. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे काकती पोलिसांनी सांगितले. यापूर्वी अटक केलेल्यांमध्ये आनंद रामा कुट्रे (वय 60), जायप्पा ऊर्फ बाळू भैरू निलजकर (52), श्रीमती सुरेखा जायप्पा ऊर्फ बाळू निलजकर (47), कु. संजना जायप्पा ऊर्फ बाळू निलजकर (21), वेंकट ऊर्फ व्यंकटेश वैजू कुट्रे (50), दौलत सिद्धाप्पा मुतगेकर (29) व लखन जायप्पा ऊर्फ बाळू निलजकर (25, सर्वजण रा. गौंडवाड, ता. बेळगाव) यांचा समावेश आहे. जाळपोळ, दगडफेक व दंगल माजविणाऱ्या 19 जणांना यापूर्वी अटक केली आहे. या प्रकरणातील संशयितांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
सतीश यांच्या खुनानंतर तोडफोड केली. त्याचबरोबर घरावर देखील दगडफेक करून तोडफोड करण्यासह गवतगंजी पेटविण्यात आल्या. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला असून यामध्ये बाळू निलजकर, सुरेखा बाळू निलजकर, संजना बाळू निलजकर, लखन बाळू निलजकर (सर्वजण रा. गौंडवाड) हे चौघे जण जखमी झाले आहे. याप्रकरणी कुमाण्णा मल्लाप्पा चौगुले, भैरू रामचंद्र सांबरेकर, मारुती गुरुनाथ निलजकर, परशुराम उमाणी पाटील, सुधाकर महादेव काकतीकर, उमेश परशराम मुतगेकर, निंगोजी गुंडू पिंगट, आनंद गुंडू पिंगट, मोहन भैरु नाथ, भाऊ बसवंत पाटील, शुभम मारुती काकतीकर, सुरज सोमनाथ चौगुले, रतन शशिकांत काकतीकर, व्यंकटेश भैरू भोगुलकर, भारत कृष्णा पाटील, गणपत देवाप्पा पिंगट, शशिकांत मल्हारी काकतीकर, विलास बाळू पिंगट आणि पुंडलिक भाविकांना पिंगट (सर्वजण रा. गौंडवाड) यांना अटक केली आहे.