बेळगाव : उद्यमबाग परिसरात दोन दिवस वीजपुरवठा नाही

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हेस्कॉमने सर्किट टॉवर उभारण्याचे काम हाती घेतले असल्याने उद्यमबाग परिसरात शनिवारी सकाळी 6 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहणार आहे. खानापूर रोड, उद्यमबाग औद्योगिक प्रदेश, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेफाटक, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, जीआयटी, देवेंद्रनगर, महावीरनगर,
खानापूर रोड, समेदनगर, ज्ञानप्रबोधन शाळा परिसर, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, पावटे कॉलनी, जैतनमाळ परिसराचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.