बेळगाव : शिवजयंती मंडळाच्या 8 जणांची निर्दोष सुटका

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगावात 10 मे 2016 ला शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीदरम्यान दगडफेक, शासकीय मालमत्तेची हानी केल्याचा आरोप करत मे 2016 मध्ये दाखल गुन्ह्यातून 8 जणांची निर्दोष सुटका झाली. तृतीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात निकाल लागला. विशाल तुकाराम ताशिलदार, सतीश नंदू घसारी, निखिल नंदू मेणसे, विकास नंदकुमार मेणसे (सर्व रा. टेंगिनकेरा गल्ली), राहुल यल्लाप्पा जाधव, नीलेश ऊर्फ पिंटू अशोक कांबळे, प्रसाद इंद्रकुमार शिखलकर (सर्व रा. खडक गल्ली), राजू मारुती शेडगे (रा. कसाई गल्ली) अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत.
बेळगावात 10 मे 2016 ला शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होती. यानिमित्त टेंगिनकेरा गल्लीतील सार्वजनिक मंडळानेही देखावा सादर केला. खडक गल्लीतील मंडळाने मिरवणुकीनिमित्त साऊंड सिस्टिम लावली होती. टेंगिनकेरा गल्लीतील मंडळाने वादग्रस्त फलक लावला होता. दोन्ही मंडळे गणपत गल्लीत आल्यानंतर पोलिसांपुढे हुज्जत घातल्याचा आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप होता. याबाबत खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अंतिम सुनावणी साक्षीदारातील विसंगती, सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रताप यादव, अ‍ॅड. हेमराज बेंच्चण्णावर यांनी काम पाहिले.