Indian-army-jawan-killed-in-wedding-harsh-gun-firing-lucknow-army-soldier-202206.jpg | Video - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला जवान मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

Video - नवरदेवाचा अतिउत्साह बेतला जवान मित्राच्या जीवावर; लग्नाच्या वरातीत जवानाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या जवानाला लग्नात नवरदेव मित्राच्या एका चुकीमुळे जीव गमावावा लागला.

लग्न म्हटलं त्याचा आनंद, उत्साह सर्वांनाच असतो. काही लोकांचा हा उत्साह अतिउत्साहात बदलतो आणि त्यानंतर ते काय करतील याचा नेम नसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात नवरदेवाचा अतिउत्साह त्याच्या जवान मित्राच्या जीवावर बेतली आहे. नवरदेवाच्या एका चुकीमुळे लग्नाच्या वरातीत त्याच्या जवान मित्राचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे. आर्मीत जवान असलेला बाबूलाल यादव काश्मीरमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वीच सुट्ट्या मिळताच तो यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील महुआरी या आपल्या गावी आला होता. तिथं तो आपला मित्र मनीष मद्धेशियाच्या लग्नाला गेला. नवरदेवाची वरात निघाली होती. नवरदेव घोड्यावर बसला होता. तिथं जवळच बाबूलाही खाली उभा होता. 
घोड्यावर बसलेल्या नवरदेवाने उत्साहात बंदुकीतून हवेत गोळी झाडली. पण हीच गोळी बाबूलालला बसली आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ @Benarasiyaa ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्या बंदुकीतून नवरदेवाने गोळी झाडली ती बंदूक जवान बाबूलालचीच होती.