twitter-notes-feature-this-new-feature-will-make-twitter-easier-to-use-202206.jpeg | Twitter Notes Feature : ट्विटरचा वापर 'या' नव्या फिचरमुळे होणार अधिक सुलभ | belgaum news | belgavkar बेळगावकर

Twitter Notes Feature : ट्विटरचा वापर 'या' नव्या फिचरमुळे होणार अधिक सुलभ

belgavkar.com | belgaum | belgavkar

ट्विटरवर ट्विटची मर्यादा 280 ही अक्षरसंख्या आहे.

मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्कींग साइट असलेले ट्विटरचे तुम्ही जर युझर्स असाल, लिहते असाल आणि सक्रिय असाल तर ट्विटरचे हे नवे फिचर तुमच्यासाठी दिलासादायक ठरु शकते. सध्‍या ट्विटरवर ट्विटची मर्यादा 280 ही अक्षरसंख्या आहे. ट्विट करत असताना अक्षरसंख्येमुळे मर्यादा येत होती. त्यामुळे हे नवे फिचर ट्विटर युझर्ससाठी खास आहे. अलिकडच्या काही दिवसात ट्विटर हे सोशल मीडिया युझर्समध्ये खूप लोकप्रिय होत आहे. अधिकाधिक युझर फ्रेंडली व्हावे म्हणून ट्विटरने आपल्या युझर्ससाठी नेहमी नवनवे फिचर आणत असते. नुकतचं ट्विटरने घोषित केले आहे की, ते एका नव्या फिचरवर काम करत आहेत. त्याला त्यांनी नोटस् (‘Notes’) असे नाव दिले आहे. या नव्या फिचरवर ते चाचणी करत आहेत.
या फिचरमूळे तुम्ही मोठे लेख, कविता इतर माहिती शेअर करु शकता. सुरुवातीला या नव्या फिचरची चाचणी लेखकांच्या एका लहान गटाकडून केली जात आहे. याव्यतिरिक्त ट्विटरने या नव्या फिचर बद्दल फारशी माहिती दिलेली नाही. सध्या ट्विटरवर ट्विट करत असताना 280 अक्षरांची मर्यादा होती. जर का हे नवे फिचर आले तर युझर्सना ट्विट वापरत असताना सुलभता येईल. या नव्या फिचरवर काम साधारणपणे पाच वर्षांपासून केले जात आहे.
टेकक्रंच (Tech Crunch) ने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केलेल्या रिपोर्टनूसार ट्विटरच्या नोटस या फिचरच्या (‘Twitter Notes’) मदतीने निबंधवजा मोठे लेख, कविता किंवा सविस्‍तर माहिती लिहू शकणार आहात. थोडक्यात हा एक ब्लॉग स्वरुपात असेल. तसेच पब्लिश केल्यानंतर ते तुम्ही लिंक इतर सोशल मीडियावरही शेअर करु शकता.
एडिट (Edit) फिचरवरही काम सुरु
आता ट्विटर वर ट्विट केल्यानंतर ट्विटमध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर करता येत नाही. एकतर ते ट्विट तुमच्या अकाउंटवरुन हटवू शकता किंवा आहे तसे अकाउंटवर ठेवू शकता. एप्रिल 2022 मध्ये ट्विटरने ‘एडीट या फिचरबद्दल सांगितले होते. आता या फिचरवरही काम सुरु आहे, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.