belgaum-khanapur-last-salute-to-subhedar-major-manohar-mirashi-belgaum-202206.jpg | बेळगाव : सुभेदार मेजर मनोहर मिराशी यांना अखेरचा सलाम | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सुभेदार मेजर मनोहर मिराशी यांना अखेरचा सलाम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : सुभेदार मेजर मनोहर भरमाणी मिराशी (वय 47) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या घरासमोर उभारलेल्या मंडपात त्यांच्या पार्थिवाचे सर्वांनी दर्शन घेतले. अनगडी (ता. खानापूर) या मूळगावी बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनगडी गावातील त्यांच्या घराकडून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन, नंदगडचे सतीश मालगोंड, खानापूरचे सीपीआय सुरेश शिंगी यांच्या उपस्थितीत बेळगाव येथील एमएलआरसीच्या जवानांनी फैरी झाडून त्यांना सलामी दिली.
यावेळी भारतीय सेनेचे अधिकारी व सैनिक, खानापूर तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी, खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माचीगड ग्राम पंचायतीचे सदस्य, विविध संघ-संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी तसेच अनगडी, होनकल, माचीगड, खानापूर ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यविधीला अनगडी व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.