एकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का

एकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतातय यासाठी लोक दिवस-रात्र अभ्यास करतात. असे असून देखील सगळ्यांनाच ही परीक्षा पास करणं सहजासहजी शक्य नाही. परंतु काही लोकांच लक किंवा नशिब इतकं चांगलं असतं की, ज्याचा आपण विचार देखील करु शकणार नाही. अशीच एक कहाणी आहे, दिल्लीतील अंकिता जैन आणि तिची बहीण वैशाली जैन यांची, ज्यांनी एकत्र नोट्स काढून आणि सारखाच अभ्यास करून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अंकिता जैन आणि तिची धाकटी बहीण वैशाली जैन यांनी एकत्र अभ्यास केला आणि UPSC परीक्षा एकत्र दिली. दोन्ही बहिणींना एकत्र यश मिळाले आणि दोघी आयएएस अधिकारी झाल्या. नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये अंकिता जैन हिने तिसरा क्रमांक पटकावला, तर वैशाली जैन हिने 21 वा क्रमांक पटकावला.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, अंकिता जैन आणि तिची धाकटी बहीण वैशाली जैन यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी याच नोट्ससह अभ्यास केला. यासोबतच अभ्यासादरम्यान एकमेकांना प्रोत्साहन आणि तयारीसाठी मदत केली.बारावीनंतर अंकिता जैनने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवी मिळवली. यानंतर त्यांना एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली, मात्र काही काळानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. मेहनत करूनही चौथ्या प्रयत्नात यश मिळवून नागरी सेवेचे स्वप्न पूर्ण केले.
बहिणीच्या तयारीचा वैशालीला फायदा : वैशाली जैनने तिची मोठी बहीण अंकिता जैनच्या तयारीचा फायदा झाला आणि ती UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाली. अंकिताच्या मदतीने तयारी करून वैशालीने नागरी सेवा परीक्षा 2020 (CSE परीक्षा 2020) मध्ये 21 वा क्रमांक मिळविला. वैशालीने नोकरी करत असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

एकाच नोट्सचा अभ्यास करत दोन बहिणींनी दिली UPSC परीक्षा, निकालाने सर्वांनाच बसला धक्का

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm