needle-stuck-in-cat-neck-saved-by-doctor-in-bihar-animal-disease-202206.jpg | मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं; | belgaum news | belgavkar बेळगावकर

मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं;

belgavkar.com | belgaum | belgavkar

मेडिकल रिपोर्ट पाहताच मालकाला बसला धक्का

माणसांप्रमाणे प्राण्यांनाही बऱ्याच समस्या उद्भवतात. आजार जडतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यातही बदल होतो. असाच बदल एका व्यक्तीने आपल्या मांजरात पाहिला. त्या व्यक्तीच्या मांजराने खाणंपिणं सोडलं होतं. त्यामुळे तिला चिंता वाटू लागली. अखेर आपलं मांजर का खातपित नाही, यामागील कारण जाणून घेण्यासाठी मालकाने मांजरीला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याला धक्काच बसला. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील हे प्रकरण आहे. जकारिया मार्केटजवळ राहणारे अशहब यांनी एक मांजर पाळलं आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांची मांजर काही खातपित नव्हती. तिच्या घशात समस्या असल्यासारखं त्यांना वाटत नव्हतं. पण नेमकं कारण समजत नव्हतं. शेवटी त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेलं.
सुरेंद्र नगरमधील एका डॉक्टरांना तिला दाखवण्यात आलं. तिथं तिच्या घशात काही समस्या आहे का, हे तपासण्यासाठी तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. तिचा एक्स-रे रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून मालक शॉक झाला. मांजरीच्या घशात चक्क सुईदोरा होता. डॉक्टरांनी मांजरीच्या घशातील हा सुईदोरा काढण्याचं ठरवलं. पण ते तितकं सोपं नव्हतं. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मांजरीच्या घशातील हा सुईदोरा मांजरीला कोणतीही दुखापत न करता काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मांजर नीट खाऊपिऊ लागलं.
या मांजरीवर उपचार करणारे पशूतज्ज्ञ डॉ. विराम यांनी सांगितलं की, घशातून सुईदोरा काढल्यानंतर मांजर आता नीट खाते-पिते आहेत. ती पूर्णपणे नीट आहे. पण घरात प्राणी पाळताना अशा छोट्या-छोट्या वस्तूंपासून त्यांना दूर ठेवायला हवं नाहीतर ते त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं.