Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमतीत घट पाहायला मिळत आहेत. मात्र देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आजही पेट्रोल (Petrol Price) डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ, अथवा घट करण्यात आलेली नाही. साधारणतः एका महिन्यापूर्वी म्हणजेच, 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला होता. यानंतर पेट्रोलच्या कमाल दरांत 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरांत 7 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तेव्हापासून तेलाचे दर स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत आज सकाळी प्रति बॅरल 109.7 डॉलर इतकी आहे. तर यूएस क्रूड WTI प्रति बॅरल सुमारे 104 डॉलरच्या आसपास आहे. सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलावर सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असताना आजही त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. 6 एप्रिलपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. क्रूडने गेल्या आठवड्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे 10 टक्के घसरण केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय? कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/ ProductsPetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).