indian-railways-unique-idea-to-stop-theft-of-fans-in-trains-know-irctc-special-technology-for-fan-in-train-202206.jpeg | ट्रेनमधले पंखे चोरणाऱ्यांची मेहनत वाया जाणार; | belgaum news | belgavkar बेळगावकर

ट्रेनमधले पंखे चोरणाऱ्यांची मेहनत वाया जाणार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

रेल्वेनं लढवलीय अनोखी कल्पना, तुम्हाला माहीत आहे का?

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या (Indian Railway) डब्यांमध्ये पंखे बसवलेले असतात. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान बहुतेक वेळा हे पंखे सुरू असतात. पण ट्रेनमध्ये सामान चोरीला गेल्याच्या किंवा रेल्वेच्या सामानाची चोरी झाल्याच्या बातम्याही तुम्ही ऐकल्या असतील. काही महाभाग रेल्वेचे पंखेही चोरतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ट्रेनमध्ये लावलेले पंखे चोरीला जाऊ शकत नाहीत.
रेल्वेचे पंखे आता कोणी चोरले तरी त्यांना त्या पंख्यांच्या काहीही उपयोग नाही. कारण, रेल्वेच्या पंख्यांमध्ये एक विशेष तंत्रज्ञान वापरलं जातं. हे पंखे अशा प्रकारे लावलेले असतात की, साधारणपणे विद्युत उपकरणे एसी (alternative current) आणि डीसी (direct current) वर चालतात. घरातली सर्व उपकरणे केवळ अल्टरनेटिव्ह करंटवर चालतात. तर, डायरेक्ट करंट म्हणजेच DC वर कमी उर्जा लागणारी उपकरणं चालविली जातात. ज्यामध्ये 5V ते 24V पर्यंत जोडलेली इलेक्ट्रिकल उपकरणे किंवा चार्जिंग उपकरणे जोडली जाऊ शकतात.
ट्रेनमध्ये बसवलेले पंखे सर्व इलेक्ट्रिकल उपकरणांपेक्षा वेगळे असले तरी ते खास DC मध्ये 110 व्होल्टवर चालण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. हे पंखे घरात चालू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची चोरी केली तरी ते घरात निरुपयोगी ठरतील. ट्रेनमध्ये हे पंखे 3-3 च्या रांगेत लावले जातात. प्रत्येक कोचच्या समोर 3 पंखे आणि दुसऱ्या बाजूला दोन पंखे असतात. अशा स्थितीत पंख्याची एक तार कापली किंवा त्यासोबत छेडछाड झाली तर बाकीचे पंखेही चालणं बंद होतं. एक प्रकारे, अलर्ट सिस्टमद्वारे, रेल्वेला पंख्यांशी संबंधित माहिती मिळते.
गेल्या काही वर्षांपासून रेल्वेनं चोरीच्या घटनांबाबत कडक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती मानली जाते, तिचे नुकसान करणाऱ्यांवर कलम 380 अन्वये कारवाई करण्याची तरतूद आहे. ज्यामध्ये 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.