महाराष्ट्र : शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील 24 तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. परंतू आमदारांनी 24 तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले.
वर्षावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून कसे पलायन केले याचा घटनाक्रम सांगितला. तसेच शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले जात असल्याचा आरोप केला आहे.
कैलास पाटील कसे निसटले? आम्हाला ठाण्यात महापौरांच्या बंगल्यावर नेण्यात आले. तिथून आम्हाला साहेब पुढे आहेत, तिकडे आपल्याला जायचे आहे, असे सांगितले. स्टाफ आमच्यासोबत होता. आम्हाला दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. पुढे निघालो, वसई-विरार मला ते भाग माहिती नाहीत, शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला.
- खतांच्या टंचाईमुळे सहायक शिक्षक पाटलांचा थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन अन् लगेच केलं निलंबित
- चिनी शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक; पोलिसांवर हल्ल्याचा होता कट
- अयोध्येत घातपाताचा कट? निर्मली कुंड चौकात सापडले डझनभर हातबॉम्ब
- Ola कडून Used Cars बिझिनेस बंद, ओला डॅश व्यवसायालाही ठोकले टाळे, EV वर लक्ष केंद्रित करणार
- महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत दावा
- Agneepath Air Force Scheme : अग्निपथ योजना : हवाई दलातील भरतीला मोठा प्रतिसाद, 3 दिवसांत 56,960 जणांची नोंदणी
- आमदार चालवत होते दुचाकी, मागे बसलेले मंत्री; एक चूक पडली महागात, वाहतूक पोलिसाने अडवलं अन्..
- Netflix : 'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्यांना कामावरून काढलं