Video : अजब गजब षटकार...!

Video : अजब गजब षटकार...!

belgavkar.com | belgaum | belgavkar

जोस बटलरने थेट पिचच्या बाहेर जाऊन मारला सिक्सर

जोस बटलरची नाबाद 86 धावांची खेळी

IPL नंतर आता इंग्लिश फलंदाज जोस बटलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमक दाखवत आहे. बटलरने नेदरलँड्स विरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात नाबाद 86 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने नेदरलँड्सचा 8 विकेट्स राखून पराभव करत मालिका 3-0 अशी खिशात घातली. बटलरने या स्फोटक खेळीत सात चौकारांसह पाच षटकार ठोकले. या दरम्यान त्याने आपल्या बॅटने एक विचित्र फटकाही खेळला. त्याच्या अजबगजब फटक्याने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले. बटलरने चक्क दोन टप्पा बॉलवर षटकार खेचला.

इंग्लंडच्या डावाच्या 29 व्या षटकात हा विचित्र प्रकार घडला. त्या षटकात वेगवान गोलंदाज पॉल व्हॅन मेकरेनचा पाचवा चेंडू हातून सुटला. चेंडू 2 टप्पा पडून बटलरपर्यंत पोहोचला. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर लेग साइडला होता पण बटलरने हा चेंडू सोडला असता तर केवळ नो बॉल ठरला असता. त्यामुळे बटलरने हा चेंडू फाइन लेगवर मारला आणि षटकार मिळवला. तसेच, पुढच्या फ्री हिटवर देखील बटलरने गगनचुंबी षटकार ठोकला.
जोस बटलर नेदरलँड्स विरुद्धच्या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने दोन डावात एकूण 248 धावा केल्या. या दरम्यान त्याने 14 चौकार आणि 19 षटकार मारले. IPL 2022 मध्ये, बटलरने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप मिळवली होती. बटलरने 17 सामन्यात 57.53 च्या सरासरीने 863 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 116 धावा होती. बटलरने या काळात चार शतके आणि 4 अर्धशतके झळकावली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Video : अजब गजब षटकार...!
जोस बटलरने थेट पिचच्या बाहेर जाऊन मारला सिक्सर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm