umesh_katti_belgaum.jpg | बेळगावसह उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य होणारच | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावसह उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य होणारच

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : लोकसभा-2024 च्या निवडणुकीनंतर देशामध्ये आणखी 50 राज्ये निर्माण केली जाणार आहेत, असे वक्तव्य मंत्री उमेश कत्ती यांनी बार असोसिएशनच्या बैठकीमध्ये केले. बेळगावसह उत्तर कर्नाटक हे स्वतंत्र राज्य होणार आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा उत्तर कर्नाटक राज्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कर्नाटक राज्य ग्राहक आयुक्त फोरम बेळगावात होणार आहे. सरकारने त्याबाबत मंजुरी दिली असून त्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनला मंत्री उमेश कत्ती यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. देशामध्ये अनेक राज्ये ही आकाराने मोठी आहेत. त्यामुळे लहान राज्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये 3, कर्नाटकमध्ये 2, उत्तरप्रदेशमध्ये 4 नवीन राज्ये होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.