man-died-of-a-heart-attack-while-watching-a-dance-at-a-wedding-in-karnataka-udupi-202206.jpg | Video : अरेरेरे, तो माणूस नाचता नाचता खूर्चीवर बसला अन् स्वत:च्याच आयुष्यातून उठला, कॅमेऱ्यात कैद मृत्यू Video कर्नाटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

Video : अरेरेरे, तो माणूस नाचता नाचता खूर्चीवर बसला अन् स्वत:च्याच आयुष्यातून उठला, कॅमेऱ्यात कैद मृत्यू Video कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कर्नाटक - उडपी : जीवन आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. चालता-बोलता, हसता-खेळता कधी कोण देवाला प्रिय होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ कर्नाटकातून समोर आला आहे. उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असलेल्या एका लग्न घरावर शोककळा पसरली आहे. एका कुटुंबात लग्नसमारंभाची धामधूम सुरु होती. मेहंदीचा कार्यक्रम सुरु होता. घरातील सर्व सदस्य गाण्याच्या तालावर थिरकत होते. याच दरम्यान डान्स पाहण्यासाठी मंडपात आलेल्या एका सदस्याला खुर्चीवर बसताच जोराचा हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. एका आनंदाचे शोकात रुपांतर झाले. हा धक्कादायक व्हिडीओ कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील आहे. गणपती आचार्य (56, रा. अंबागीलू) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
man-died-of-a-heart-attack-while-watching-a-dance-at-a-wedding-in-karnataka-udupi-202206-udupi.jpeg | Video : अरेरेरे, तो माणूस नाचता नाचता खूर्चीवर बसला अन् स्वत:च्याच आयुष्यातून उठला, कॅमेऱ्यात कैद मृत्यू Video कर्नाटक | belgaum news | belgavkar बेळगावकर
मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गणपती आचार्य हे व्यवसायाने सोनार होते. कार्यक्रमस्थळी खुर्चीवरून पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना मणिपाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र ही घटना नक्की कधी घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

गुजरातमध्येही घडली होती अशीच घटना
लग्नाची वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचताना वराला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची अशीच दुर्दैवी घटना गुजरातमधील सुरतमध्ये घडली आहे. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मितेश भाई चौधरी (33) असे मयत वराचे नाव आहे. सुरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील मितेश भाई चौधरी याची बालोद तालुक्यातील धामंडळा गावात वरात जाणार होती. वरात निघायला थोडा वेळ होता. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होती. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही आणि तोही डीजेजवळ पोहोचला. दरम्यान नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर बसवून नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशला छातीत दुखू लागलं आणि त्याचा मृत्यू झाला.