बेळगाव : अल्पवयीन युवतीचा विवाह रोखला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : हेब्बाळ (ता. खानापूर) येथे सुरु असलेला अल्पवयीन युवतीचा विवाह महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेळीच रोखला. बेळगाव तालुक्यातील कोंडुस्कोप येथील 17 वर्षे 7 महिने वयाच्या युवतीचा हेब्बाळ येथील 28 वर्षीय तरुणाशी विवाह निश्चित झाला होता. सोमवारी हळदीचा कार्यक्रमही पार पडला. मंगळवारी दुपारी अक्षता रोपण सोहळ्याच्या काहीक्षण आधी महिला आणि बाल कल्याण खात्याच्या पथकाने लग्नमंडपात जाऊन विवाह रोखला. या कारवाईत नंदगडचे पोलिस, पीडीओ, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि तलाठ्यांनी सहभाग घेतला.