बेळगाव : लाच घेणारा अधिकारी रंगेहाथ जाळ्यात सापडला - एसीबी

बेळगाव : लाच घेणारा अधिकारी रंगेहाथ जाळ्यात सापडला - एसीबी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खत विक्री परवाना देण्यासाठी 20000 रुपयांची लाच घेणारा कृषी अधिकारी योगेश अगडी हा रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी - ACB) जाळ्यात सापडला. एकूण 30000 रुपयांची मागणी करून आधी 10000 घेतले होते. उर्वरित 20000 देण्यापूर्वी खत विक्रीसाठी अर्ज केलेले मौनेश्वर कम्मार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. योगेशला रंगेहाथ पकडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कार्यालयाची झडती घेतली व त्यानंतर घरी जाऊनही तपासणी केली.
यावेळी कार्यालयात 44000 तर घरात 3 लाख 54000 अशी एकूण 3 लाख 98 हजारांची रोकड सापडली. बाबले गल्ली विठ्ठल रुक्मिणी रोड, अनगोळ येथे राहणारे मौनेश्वर कम्मार यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले. सिटी कंपोस्ट मार्केटिंग या नावाने कंपनी सुरू करून यासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी त्यांनी कृषी खात्याकडे ऑनलाईन अर्ज केला. यानंतरच्या प्रक्रियेसाठी व परवाना मंजुरीसाठी येथील सह कृषी संचालक कार्यालयातील कृषी अधिकारी योगेश अगडी याने 30000 रुपयांची लाच मागितली.
यापैकी 10000 रूपये त्याने आधीच स्वीकारले होते. उर्वरित 20000 रुपयांची रक्कम घेऊन बुधवारी कम्मार यांनी कृषी कार्यालय गाठले. तत्पूर्वी त्यांनी याची तक्रार येथील एसीबीकडे केली होती. एसीबीचे उत्तर विभागाचे जिल्हा पोलिस प्रमुख बी. एन. न्यामगौडर व उपअधीक्षक जे. एम. करूणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला व कृषी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. एसीबीचे निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, निरंजन एम. पाटील व बेळगावातील एसीबीच्या अन्य सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : लाच घेणारा अधिकारी रंगेहाथ जाळ्यात सापडला - एसीबी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm