MS Dhoni ‘थाला’ची कॉलिवूडमध्ये एन्ट्री

MS Dhoni ‘थाला’ची कॉलिवूडमध्ये एन्ट्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

थालापथी विजयसोबत करणार चित्रपटाची निर्मिती

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असून तो सध्या फक्त लीग क्रिकेट खेळतोय. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतही त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र क्रिकेटसोबत धोनी अनेक क्षेत्रांमध्ये हात आजमावतोय. मागे तो शेती करत असल्याचे दिसून आले होते. आता तो मनोरंजन क्षेत्रामध्येही एन्ट्री घेणार आहे. महेंद्रसिंह धोनी चित्रपट निर्माता बनणार असून दाक्षिणात्य सुपरस्टार थालापथी विजय याच्यासोबत एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
कॉलिवूडमध्ये धोनीची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. या चित्रपटामध्ये धोनी कॅमियो करण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सुपरस्टार थालापथी विजय याला खुद्द महेंद्रसिंह धोनी याने फोन केला असून त्याच्यासोबत चित्रपट करण्याचे निमंत्रण दिले आहे. विजय यानेही धोनीला या चित्रपटासाठी होकार दिल्याचे कळतेय. चेन्नई सुपर किंग्जसाठी धोनी सुरुवातीपासून खेळत असल्याने तमिळनाडूमध्ये तो चांगलाच प्रसिद्ध आहे. याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न धोनीचा दिसतोय.
चेन्नईशी धोनीचे खास नाते असल्याने धोनीलाही थाला असे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वीच धोनीने आपले प्रोडक्शन हाऊस लॉन्च केले होते. या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एक अँनिमेशन सीरिजही बनवल होती. तत्पूर्वी धोनीच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट बनला होता. यासाठी धोनीने देखील पैसा लावण्याचे समोर आले होते. क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास धोनी याच वर्षी आयपीएलमध्ये दिसला होता. तसेच आयपीएल 2023 मध्ये तो खेळणे पक्के मानले जात आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याला तुझा शेवटचा सामना कधी खेळणार असे विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने मी माझा अखेरचा सामना चेन्नईत खेळेल असे त्याने म्हटले होते. दरम्यान, यंदाच्या वर्षी धोनीच्या जागी जडेजाला कर्णधार करण्यात आले होते. परंतु मध्येच त्याने कर्णधारपद सोडले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. मात्र चेन्नईचा संघ यंदा गुणतालिकेमध्ये तळाशी राहिला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

MS Dhoni ‘थाला’ची कॉलिवूडमध्ये एन्ट्री
थालापथी विजयसोबत करणार चित्रपटाची निर्मिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm