ICC Ranking : इशान किशन भारतीयांमध्ये ठरला 'टॉपर';

belgavkar.com | belgaum | belgavkar

महेंद्रसिंग धोनीच्या 'खास' फलंदाजाला देतोय टक्कर

कसोटी क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा अव्वल, तर आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर

ICC Ranking : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली 0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. पाचवा सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने भारताला 2-2 अशा बरोबरीच्या निकालावर समाधान मानावे लागले. आयपीएल 2022मध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. या मालिकेत इशानने 200+ धावा केली आणि त्याचा फायदा त्याला आयसीसीच्या ट्वेंटी-20 रँकींगमध्ये झालेला पाहायला मिळाला. आयसीसीने बुधवारी ट्वेंटी-20 व कसोटी क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. त्यात इशानने गरुड भरारी घेतली आहे. ट्वेंटी-20 फलंदाजांत टॉप टेनमध्ये तो एकमेव भारतीय आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत इशानने  41च्या सरासरीने सर्वाधिक 206 धावा केल्या होत्या. त्याने मागील आठवड्यात 68 स्थानांची झेप घेतली होती. आज इशानने ट्वेंटी-20 फलंदाजांत न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याच्यासह संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले आहे.
belgaum_belgavkar_gallery_belgav.jpg | ICC Ranking : इशान किशन भारतीयांमध्ये ठरला 'टॉपर'; | belgaum news | belgavkar बेळगावकर
डेव्हॉन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. डेव्हॉन व इशान यांचे प्रत्येकी 703 रेटींग पॉइंट्स आहेत आणि भारताकडून सर्वाधिक रेटींग पॉइंट्स इशानने पटकावले आहेत. दिनेश कार्तिकनेही 108व्या क्रमांकावरून थेट 87 क्रमांकावर झेप घेतली आहे. पाकिस्तानचे बाबर आजम  (818) व मोहम्मद रिझवान (794 ) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम, इंग्लंडचा डेवीड मलान व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच यांचा क्रमांक येतो. ट्वेंटी-20 गोलंदाजांमध्ये टॉप टेनमध्ये एकही भारतीय नाही. युजवेंद्र चहल 23व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, इंग्लंडचा आदील राशिद, अफगाणिस्तानचा  राशिद खान हे टॉप थ्री आहेत.  
कसोटी क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा अव्वल, तर आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने दोन स्थानांची झेप घेत अश्विनला तिसऱ्या स्थानी ढकलले आहे. गोलंदाजांमध्ये अश्विन  व जसप्रीत बुमराह यांनी दुसरे व तिसरे स्थान टिकवले आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

ICC Ranking : इशान किशन भारतीयांमध्ये ठरला 'टॉपर';
महेंद्रसिंग धोनीच्या 'खास' फलंदाजाला देतोय टक्कर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm