वीज पडण्याआधीच माहिती देईल केंद्र सरकारने लॉन्च केलेलं हे App, आताच डाऊनलोड करा

वीज पडण्याआधीच माहिती देईल केंद्र सरकारने लॉन्च केलेलं हे App, आताच डाऊनलोड करा

belgavkar.com | belgaum | belgavkar

पावसाळ्यात वीज पडण्याची भीती असते. त्यामुळे त्यापासून बचावासाठी हे अ‍ॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता.

हे अ‍ॅप 30 मिनिटांपूर्वी वीज, गडगडाट आणि विजांची अचूक माहिती देईल.

पावसाळ्यात वीज पडून जीवित तसंच वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. हे टाळायचं असेल तर केंद्र सरकारनं लाँच केलेलं दामिनी हे अ‍ॅप वापरण्याचा सल्ला प्रशासनानं दिलाय. एखाद्या जागी वीज पडणार असेल तर या अ‍ॅपद्वारे 5 चे 15 मिनिटं आधी नोटिफिकेशन येतं. त्यामुळे नुकसान टाळता येऊ शकतं. (Damini App for alert of lightning) भारत सरकारच्या पृथ्वी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे यांनी लोकांना वीज पडण्यापासून सावध करण्यासाठी 'दामिनी अ‍ॅप' विकसित केले आहे. हे अ‍ॅप 30 मिनिटांपूर्वी वीज, गडगडाट आणि विजांची अचूक माहिती देईल. यासाठी शास्त्रज्ञांनी देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे 48 सेन्सर्ससह लाइटनिंग लोकेशन नेटवर्क स्थापित केले आहे.
नेटवर्कमुळे विजेचा अचूक अंदाज येतो, असे हवामानतज्ज्ञ यांनी सांगितले. या नेटवर्कच्या आधारे, दामिनी अ‍ॅप विकसित केले गेले आहे, जे 40 किमीच्या परिघात विजेच्या संभाव्य स्थानाची माहिती देईल. हे नेटवर्क विजांच्या गडगडाटासह वादळाचा वेग देखील सांगते. अ‍ॅपमध्ये, वीज पडल्यास प्रतिबंध आणि सुरक्षा उपायांसह प्रथमोपचाराची माहिती देखील खाली दिली आहे. डॉ.सिंग म्हणाले की, विज पडणे ही प्रतिकूल हवामानाची स्थिती आहे, जी मानव व प्राण्यांसाठी घातक आहे. हे थांबवता येत नाही, पण सतर्कता आणि दामिनी अ‍ॅपद्वारे वादळाचा अंदाज वर्तवल्यास जीवित व वित्तहानी टाळता येऊ शकते.
काय खबरदारी घ्याल? डॉ. सिंह म्हणाले की, दामिनी अ‍ॅपवरून इशारा मिळाल्यावर वीज टाळण्यासाठी मोकळ्या शेतात, झाडांखाली, डोंगराळ भागात, खडकांचा अवलंब करू नका. धातूची भांडी धुवू नका आणि आंघोळ वगैरे टाळा. घरी जाणे शक्य नसेल तर गुडघे टेकून मोकळ्या जागेवर बसावे. छत्री कधीही वापरू नका. तसेच हाय टेंशन वायर्स आणि टॉवर्सपासून दूर राहा.
दामिनी अ‍ॅप मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करावे
दामिनी अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते. डाऊनलोड केल्यानंतर त्यात नोंदणी करावी. यामध्ये त्यांना त्यांचे नाव आणि ठिकाणाची माहिती द्यावी लागेल. ही माहिती टाकताच, हे अ‍ॅप त्या ठिकाणापासून 40 किमीच्या परिघात विजेबाबत SMS अलर्ट देईल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

वीज पडण्याआधीच माहिती देईल केंद्र सरकारने लॉन्च केलेलं हे App, आताच डाऊनलोड करा
पावसाळ्यात वीज पडण्याची भीती असते. त्यामुळे त्यापासून बचावासाठी हे अ‍ॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm