Viral Video : पोलीस शिपाई पत्नीसह खड्ड्यात, दुचाकीही पावसाच्या पाण्यात

Viral Video : पोलीस शिपाई पत्नीसह खड्ड्यात, दुचाकीही पावसाच्या पाण्यात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बापरे...!
स्कूटीसह पती-पत्नी पडले खड्ड्यात, थोडक्यात वाचला जीव, Video होतोय व्हायरल

रस्त्यांवरील खड्डे पाणीमय होतात. त्यातून अनेक अपघाताच्या घटनाही घडत असतात.

पावसाळ्यात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचते, रस्त्यांवरील खड्डे पाणीमय होतात. त्यातून अनेक अपघाताच्या घटनाही घडत असतात. उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथे एका दुचाकीस्वार कपल्सचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुचाकीस्वारास पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने ते स्कुटीसह खोल खड्ड्यात पडले. अलीगढमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दुचाकीसह दोघेही गाडीसह पाण्यात पडतानाचे दिसून येते. त्यानंतर तात्काळ स्थानिक लोकं घटनास्थळी धाव घेत खड्ड्यातून अपघातग्रस्तांना बाहेर काढतात. मात्र, त्यांची गाडी खड्डयातच राहते.
अलीगढच्या किशनपूरजवळ शनिवारी झालेल्या पावसानंतर पोलीस शिपाई त्याच्या पत्नीसह रस्त्यावर जात होता. त्यावेळी, रस्त्यातच ही दुर्घटना घडली. अपघाताची ही दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातग्रस्त पीडित पोलीस शिपाई आणि त्यांच्या पत्नीला किरकोळ जखम झाली असून त्यांनी जवळील रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्याचे समजते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Viral Video : पोलीस शिपाई पत्नीसह खड्ड्यात, दुचाकीही पावसाच्या पाण्यात
बापरे...! स्कूटीसह पती-पत्नी पडले खड्ड्यात, थोडक्यात वाचला जीव, Video होतोय व्हायरल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm