फुटबॉल इतिहासात प्रथमच असे होणार; वर्ल्डकपचे आयोजन एकाच वेळी...

फुटबॉल इतिहासात प्रथमच असे होणार;
वर्ल्डकपचे आयोजन एकाच वेळी...

belgavkar.com | belgaum | belgavkar

3 देशातील 16 शहरांमध्ये होणार FIFA World Cup

32 ऐवजी 48 संघ असतील

FIFA World Cup : फिफा वर्ल्डकप 2026 चे आयोजन अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाया 3 देशातील 16 शहरांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 48 संघांचा सहभाग असेल. 2026 साली होणाऱ्या फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup) चे आयोजकपद 3 देशांना देण्यात आले आहे. वर्ल्डकपचे आयोजकपद तिघा देशांना देण्यात आल्याची फिफाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफाने जाहीर केले की, 2026 साली होणारा वर्ल्डकप स्पर्धा 16 शहारात पार पडले. या स्पर्धेत 32 ऐवजी 48 संघ असतील. या वर्षाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या काळात होणार आहे, ज्यात 32 संघांचा सहभाग असेल.
2026 साली होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत 80 पैकी 60 सामने अमेरिकेत होणार आहेत. कॅनडा आणि मॅक्सिकोमध्ये प्रत्येकी 10 सामने होतील. अमेरिकेच्या फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कार्लोस कोरडेरियो यांनी अमेरिकेच्या फुटबॉलसाठी ही एक मोठी घटना असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेत कुठे होणार सामने - अँटलांटा, बोस्टन, डलास, ह्यूस्टन, कॅन्सास, लॉस एजिल्स, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रासिस्को, सिएटल

मॅक्सिको- गौडालाजारा, मॅक्सिको सिटी, मॉन्टेरी

कॅनडा- टोरंटो, वॅकूवर
याआधी 20 वर्षापूर्वी म्हणजे 2002 साली जपान आणि दक्षिण कोरिया यांनी संयुक्तपणे वर्ल्डकपचे आयोजन केले होते. मॉस्कोमध्ये झालेल्या ६८व्या फिफा काँग्रेसमध्ये सदस्यांनी अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा यांना मतदान केले. या देशांनी संयुक्तपणे दावेदारी केली होती. मतदानात त्यांनी मोरक्कोचा पराभव केला. 200 पैकी 134 सदस्यांनी संयुक्त दावेदारीला मदतान दिले तर मोरक्कोला फक्त 65 मते मिळाली.
फिफा वर्ल्डकप हा फुटबॉलमधील आणि जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आणि लोकप्रियता ऑलिम्पिकच्या तोडीची असते. 1930 साली सुरु झालेल्या या स्पर्धेवर संपूर्ण जगाची नजर असते. प्रत्येक चार वर्षांनी फुटबॉल वर्ल्डकप होतो. गेल्या वर्षी ही फ्रान्सने विजेतेपद मिळवले होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

फुटबॉल इतिहासात प्रथमच असे होणार; वर्ल्डकपचे आयोजन एकाच वेळी...
3 देशातील 16 शहरांमध्ये होणार FIFA World Cup

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm