बेळगावात 6 वा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा

बेळगावात 6 वा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावमध्ये 5 ते 6 गावांमध्ये नियमितपणे सराव चालू

बेळगाव आणी मल्लखांब (Mallakhamba) : मल्लखांब हा एक व्यायाम प्रकार आहे. हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जातो. हा कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार आहे. कसरतींचा आणी कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. मल्लखांब खेळाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते. परंतु लिखित स्वरूपात हा फारसा आढळत नाही. रामायणकाळात हनुमंतानी मल्लखांबाचा शोध लावला असे सांगितले जाते. सोमेश्वर चालुक्याने सन 1135 मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांब खेळाचे वर्णन आढळते. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात आढळते. पेशव्यांनी देशभरात कुस्तीचे आखाडे सुरू केले. या आखाड्यांमध्येच त्यांनी मल्लखांबांचीही स्थापना केली.
गुराखी समाजात मलखांबाचे महत्त्व मोठे आहे. मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना 29 जानेवारी 1989 रोजी उज्जैन, मध्यप्रदेश येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडेरेशन (regd.) इंडिया या नावाने ओळखले जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील 29 राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. कुस्तीच्या कामी मल्लखांबाचा उपयोग कसा व किती होतो याचा अंदाज सर्वांना माहिती आहेच; पण त्याशिवाय नुसता व्यायामाचा प्रकार म्हणून देखील मल्लखांब फार वरच्या दर्जाचा मनाला जातो. या व्यायामापासून आरोग्याचा चांगला लाभ होतो. यातील कौशल्ये करताना निरनिराळ्या प्रकारे शरीर वाकवून करायची असल्याने शरीराच्या आतील इंद्रियांच्या क्रिया सुधारतात. शरीराच्या सर्व भागातील स्नायूंना उत्तम प्रकारे तान पडून ते मजबूत होतात. या कौशल्यांमुळे शरीर लवचिक राहते.या शारीरिक कौश्ल्यंत पुष्कळ वेळा, खाली डोके वर पाय अशा स्थितीत राहावे लागते, त्यामुळे रक्ताभिसरणाचे कार्य सुधारते व आरोग्य चांगले राहते. थोडक्यात, आपल्या असे लक्षात येते, की शरीरातील विविध क्षमता विकसित करण्यासाठी मल्लखांब उपयुक्त आहे.
बाळंभटदादा देवधर यांना आधुनिक मल्लखांबाचे जनक मानतात. आपल्या बेळगाव मध्ये देखील मल्लखांब फार पूर्वीपासूनच तालीम मध्ये व्यायामाकरिता वापर होत होता, पण काही काळापुरता अस्तंगत पावला होता; परंतु या मागील 10 वर्षांत पुन्हा नव्या जोमाने सरावस सुरवात झाली . बेळगाव मधील मराठा लाईट इंफंट्रीमध्ये तर प्रत्येक सैनिकास मल्लखांब वरील कसरती करणे अनिवार्य असते. बेळगावमध्ये मल्लखांब पुनःश्च सुरू करण्या करिता मुंबईचे प्रशिक्षक मुळेचे बेळगावचे राहणारे सचिन चिटणीस यांनी प्रयत्न केले आणि सध्या तो वारसा सुरज देसुरकर हे चालवत आहे. राजे शंभू स्पोर्ट्स क्लब आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संयुक्त विद्यमाने नियमित प्रशिक्षण देण्याचा विडा उचलला आहे आणि तो ही मोफत. बेळगावमध्ये साधरण 5 ते 6 गावांमध्ये नियमितपणे सराव चालू आहे. बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, होनगा येथे सुरु असून भविष्यात बेळगाव शहरी भागात देखील प्रशिक्षण केंद्र चालू होतील असा मनसुबा आहे.
सर्व बेळगाववासीयांना 6 व्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात 6 वा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा
बेळगावमध्ये 5 ते 6 गावांमध्ये नियमितपणे सराव चालू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm