बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक शनिवारी (4 जून) दुपारी 3 वाजता मराठा मंदिर कार्यालयात होणार आहे. या बैठकीत तज्ज्ञ समितीच्या आगामी बैठकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना केली आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय अ‍ॅड. राम आपटे, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील आणि दिनेश ओऊळकर यांचाही त्यामध्ये समावेश आहे. येत्या 7 किंवा 8 जून रोजी मुंबई येथे तज्ज्ञ समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये वकील, अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सुनावणीची तयारी होणार आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात कन्नडसक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 20 दिवसांच्या आत सर्व सरकारी परिपत्रके, कागदपत्रे, शासकीय इमारतींवरील फलक मराठीत लावण्याचे आदेश देण्यात यावेत, अन्यथा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या मोर्चाबाबत लवकरच जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यावरसुद्धा मध्यवर्ती समिती बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय हिंडलगा येथे हुतात्मा भवन उभारणीसाठी अनेकांनी देणगी जाहीर केली आहे. त्यामुळे देणगी जमा करून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यावरही चर्चा अपेक्षित आहे.
प्रामुख्याने मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या तज्ज्ञ समिती बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा करायची सुनावणीसाठी आवश्यक तयारी कशी करायची, यावर चर्चा होणार आहे. या बैठकीला मध्यवर्ती समितीच्या सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm