बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी समितीच्या वतीने निवेदन सादर

बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी समितीच्या वतीने निवेदन सादर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी परिपत्रके देण्यात यावीत. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे असंख्य कार्यकर्ते उपस्थित झाले होते. यावेळी समितीच्या वतीने यांच्यासाठी निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, मराठी कागदपत्रांसाठी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. निकाल आपल्या बाजुला लागला तरी गेल्या 18 वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी परिपत्रके देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती नेते प्रकाश मरगाळे, शिवाजी सुंठकर,मालोजी अष्टेकर, प्रकाश शिरोळकर, शुभम शेळके, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, मनोज पावशे, विकास कलघटगी, दत्ता उघाडे, बी. डी. मोहनगेकर, आर .आय. पाटील, सरस्वती पाटील, रणजित चव्हाण पाटील, आर.एम. चौगुले, सुधीर चव्हाण, सुरेश अगासगेकर, दिलीप चव्हाण, मदन बामणे, शिवाजी मंडोळकर, संतोष मंडलिक,महेश टाकसाळी, एस.एल. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, प्रकाश अष्टेकर, धनंजय पाटील, दत्ता जाधव, पुंडलिक पावशे, भागोजी पाटील, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी समितीच्या वतीने निवेदन सादर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm