बेळगाव : हुतात्मादिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

बेळगाव : हुतात्मादिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा

belgavkar.com | belgaum | belgavkar

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्त्यांना आवाहन

बेळगाव : कन्नडसक्ती विरोधातील आंदोलनात 9 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. 1986 पासून कन्नडसक्ती तीव्रतेने मराठी भाषिकांवर लादण्यात येत आहे. या कन्नड सक्तीविरोधात बलिदान दिलेल्या सीमावासियांना विसरून चालणार नाही. त्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवार 1 जून रोजी सकाळी 9 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले.
सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सीमाभागात दररोज होणार्‍या अन्यायामध्ये वाढ होत आहे. यामुळे मराठी भाषिक त्रस्त झाले असून, त्यांना यातून मुक्तता मिळणे गरजेचे आहे. जोवर सीमाप्रश्नाचा निकाल लागत नाही तोवर संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा. यामुळे मराठी भाषिकांवर होणारे अन्याय-अत्याचार कमी होतील. आज प्रत्येक कार्यालयात सरकारी कागदपत्रांमध्ये कन्नडभाषेची सक्ती करण्यात आली आहे. मराठी युवकांवर विनाकारण गुन्हे घातले जात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही.
त्यामुळे मराठी भाषिकांनी हुतात्मादिनाच्या निमित्ताने आपली ताकद दाखवून द्यायची आहे. हुतात्मादिनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, दक्षिण विभागप्रमुख सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, माजी महापौर सरिता पाटील यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : हुतात्मादिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्त्यांना आवाहन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm