बेळगाव : चौघांना अटक;
शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कित्तूर वनविभागाच्या हद्दीमध्ये रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना वनविभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून 54 किलो डुकराचे मांस जप्त केले आहे. कित्तूर तालुक्यातील हे सर्व आरोपी डुकराची शिकार करून त्याचे मांस विक्री करत असल्याची माहिती वनविभाग पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याठिकाणी जाऊन या सर्वांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मशाप्पा यल्लाप्पा शट्ट्याप्पा परसण्णावर, रामाप्पा हणमंताप्पा दोड्डगुंजी, भरोप्पा शट्ट्याप्पा परसण्णावर, फकिराप्पा यरगण्णावर (सर्व रा. काद्रोळी, ता. कित्तूर) यांना अटक करण्यात आली आहे.
54 किलो मांस जप्त या कारवाईमध्ये त्यांच्याकडून 54 किलो मांस जप्त तसेच दोन चाकू, विळे आणि तारेचे कुंपन जप्त करण्यात आले आहे. वनाधिकारी वाणीश्री हेराडे, कित्तूर उपक्षेत्र वनाधिकारी संजय मगदूम, अजित मुल्ला, गिरीश मक्केद यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चौघांना अटक; शिकार करून मांस विक्रीचा प्रयत्न

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm