बेळगाव : अनगोळ येथे रंगेहात एकाला पकडले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : शिवशक्तीनगर, अनगोळ येथे मटका घेत असताना रंगेहात एकाला पकडण्यात आले. उद्यमबाग पोलीस स्थानकाचे एसआय यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी एकाने मात्र तेथून पलायन केले. या प्रकरणी पोलीस उद्यमबाग स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. इम्रान मुनावर खान - पठाण (रा. दुसरा क्रॉस, झटपट कॉलनी, अनगोळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर परशराम मेत्री (रा. अनगोळ) याने पलायन केले आहे.
उद्यमबाग पोलीस पोलीस स्थानकाचे एएसआय एस. सी. हन्नीकेरी हे गस्त घालत होते. यावेळी इम्रान हा शिवशक्तीनगर येथे मटका घेत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून 1050 रुपये जप्त करण्यात आले आहेत. फरार झालेल्या एकाचा मात्र पोलीस तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अनगोळ येथे रंगेहात एकाला पकडले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm