परिस्थिती छोटी, पण मन मोठं...! दिव्यांग भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली ₹ 90000 ची गाडी, कहाणी वाचून पाणावतील डोळे

परिस्थिती छोटी, पण मन मोठं...!
दिव्यांग भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली ₹ 90000 ची गाडी, कहाणी वाचून पाणावतील डोळे

belgavkar.com | belgaum | belgavkar

हृदयस्पर्शी...!
भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली. 'हे' आहे कारण, रोज कमावतात इतके रुपये

प्रेमासाठी काहीजण वाटेल ते करतात. प्रेमात जात-पात, श्रीमंत-गरीब किंवा इतर गोष्टी दिसत नाहीत, असं म्हटलं जातं. अशाच एक अनोख्या प्रेमाची गोष्ट समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून हृदयस्पर्शी घटना घडली आहे. यामध्ये एक भिकारी आपल्या पत्नीवर असलेल्या प्रेमामुळे चर्चेत आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू आहेत. भीक मागून आयुष्य जगणाऱ्या संतोषने आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून गाडी दिली आहे. आता दोघं गाडीवरूनच भीक मागण्यासाठी जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष पायाने दिव्यांग आहेत. ते ट्रायसायकलने फिरून भीक मागतात आणि पत्नी मुन्नीबाई त्यांची मदत करते. संतोष साहू यांनी सांगितलं की ते स्वतः ट्रायसायकलवर बसतात आणि त्यांची पत्नी याला धक्का देण्याचं काम करायची. अनेकदा अशी परिस्थिती यायची की रस्ता खराब असल्याने त्यांच्या पत्नीला या ट्रायसायकलला धक्का देणं खूप कठीण जायचं. पत्नीला होणारा हा त्रास संतोषला पाहावत नव्हता.
पत्नी याच दरम्यान अनेकदा आजारीही पडली होती. यात तिच्या उपचारासाठी बरेच पैसे खर्च झाले. एक दिवस मुन्नीने संतोषला गाडी खरेदी करण्याचा सल्ला दिला. परिस्थिती बिकट असतानाही संतोषने ठरवलं होतं की काहीही झालं तरी पत्नीसाठी मोपेड खरेदी करायचीच. दोघंही बस स्टॅण्ड, मंदीर आणि मशिदीच्या बाहेर भीक मागत असे आणि दररोज जवळपास 300 ते 400 रुपये कमवत असे. सोबतच दोघांना आरामात दोन वेळचं जेवणही मिळत असे. अशाप्रकारे ही रक्कम जमा करत संतोषने 4 वर्षात 90000 रूपये जमा केले आणि या शनिवारी कॅश देऊन गाडी खरेदी केली. कोणीतरी याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. सध्या त्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

परिस्थिती छोटी, पण मन मोठं...! दिव्यांग भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली ₹ 90000 ची गाडी, कहाणी वाचून पाणावतील डोळे
हृदयस्पर्शी...! भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली. 'हे' आहे कारण, रोज कमावतात इतके रुपये

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm