भाजपची पळापळ...! अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी हेलिकॉप्टर पाठवून आणलं उमेदवाराला - कर्नाटक

भाजपची पळापळ...!
अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी हेलिकॉप्टर पाठवून आणलं उमेदवाराला - कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

उमेदवार वेळेत पोचू शकत नसल्यानं नेत्यांची उडाली धावपळ

कर्नाटक : कर्नाटकात विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकींसाठी भाजप (BJP) नेतृत्वाने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत काल (24 मे) सायंकाळपर्यंत होती. मात्र, भाजपच्या उमेदवार हेमलता नायक या त्यांच्या मूळगावी होत्या. त्या अर्ज भरण्यासाठी पोचू शकणार नाहीत हे लक्षात येताच पक्ष नेतृत्वाने थेट हेलिकॉप्टर पाठवून त्यांना आणले. यामुळे त्या अखेर वेळेत पोचल्या आणि त्यांनी अर्ज भरला.
भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. त्यात हेमलता नायक यांचे नाव होते. पण नायक या नेमक्या त्यांच्या मूळगावी कोप्पळ येथे होत्या. अर्ज भरण्यासाठी केवळ चार तासांचा कालावधी शिल्लक राहिला होता. कोप्पळमधून अर्ज भरण्यासाठी चार तासांत पोचणे शक्य नव्हते. अखेर भाजप नेतृत्वाकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या. अखेर त्यांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. नायक या कोप्पळमधून तुमकूर येथे पोचल्या. तिथे त्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झाले होते. तेथून हेलिकॉप्टरने त्या बंगळूरमध्ये पोचल्या. एवढ्या सगळ्या धावपळीनंतर नायक या वेळ संपण्याआधी अर्ज भरण्यासाठी पोचल्याने भाजप नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कर्नाटकात विधान परिषदेच्या 7 जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली होती. यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनाच तिकीट नाकारण्यात आले आहे. यामुळे भाजप नेतृत्वाने येडियुरप्पांना हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारसही करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भाजपची पळापळ...! अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी हेलिकॉप्टर पाठवून आणलं उमेदवाराला - कर्नाटक
उमेदवार वेळेत पोचू शकत नसल्यानं नेत्यांची उडाली धावपळ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm