आरारारा.... खतरनाक...! अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘Sorry’; पोलिसांकडून शोध सुरू - कर्नाटक

आरारारा.... खतरनाक...!
अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘Sorry’;
पोलिसांकडून शोध सुरू - कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

शाळेचे प्रवेशद्वार आणि त्यालगतच्या भिंतींवर दोन बदमाशांनी ‘सॉरी’ लिहिलेले दिसत आहे.

कर्नाटक : उत्तर-पश्चिम बंगळुरूच्या एका खासगी शाळेत एक विचित्र प्रकार घडला आहे. शाळेच्या आवारात काही बदमाशांनी ‘Sorry’ रंगवले आहे. सुनकडकट्टे येथील शांतीधाम शाळेचे प्रवेशद्वार आणि त्यालगतच्या भिंतींवर ‘सॉरी’ लिहिलेले दिसत आहे. यामागे काही विद्यार्थ्यांचा हात असल्याचा संशय शाळा प्रशासनाला होता. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. डिलिव्हरी बॉयच्या वेषात दोघेही एक मोठी बॅग आणतात, जी सहसा फूड डिलिव्हरीसाठी वापरली जाते.
यावेळी ते रंग काढून संपूर्ण आवारात ‘सॉरी’ लिहिताना दिसत होता. पश्चिम बेंगळुरूचे डीसीपी डॉ संजीव पाटील म्हणाले, ‘सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार दिसत होते. त्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटक ओपन प्लेसेस (प्रिव्हेन्शन ऑफ डिसफिगरमेंट) कायद्यान्वये गुन्हा आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटर अकाऊंटवर या घटनेची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करत घटनेची माहितीही दिली.
ट्विटमध्ये लिहिले की, ‘कर्नाटकातील बेंगळुरू येथील सनकडकट्टे येथे एका खासगी शाळेच्या परिसरात आणि लगतच्या रस्त्यावर सॉरी लिहिले. या प्रकरणी पश्चिम बंगळुरूचे डीसीपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीस्वार दोघेजण दिसत आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तूर्तास, या प्रकरणाची अधिक माहिती येणे बाकी आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आरारारा.... खतरनाक...! अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘Sorry’; पोलिसांकडून शोध सुरू - कर्नाटक
शाळेचे प्रवेशद्वार आणि त्यालगतच्या भिंतींवर दोन बदमाशांनी ‘सॉरी’ लिहिलेले दिसत आहे.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm