7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

1 जुलैपासून वाढून येणार Salary, होणार मोठा फायदा

जर सरकारने 4 टक्के डीए वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्के ते 38 टक्क्यांपर्यंत होईल. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलैपासून जबरदस्त वाढ होत आहे. याच बरोबर, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट 38 टक्के होणार आहे. या वाढीचा फायदा त्यांना पगारातील बम्पर वाढीच्या स्वरुपात दिसेल. 
पुन्हा वाढणार महागाई भत्ता
सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही (Dearness Allowance Hike) वाढ केली जाऊ शकते. मार्च महिन्यात आलेल्या ऑल इंड‍िया कंझ्यूमर प्राइस इंडेक्‍स (AICPI) वरून, जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो, हे निश्चित झाले आहे.
काय सांगतात आकडे? जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 च्या AICP Index मध्ये घसरण झाली होती. जानेवारी महिन्यात AICP इंडेक्‍सचा आंकडा 125.1 वर होता. तर, फेब्रुवारी महिन्यात तो 125 वर आला, मात्र, मार्च महिन्यात हा आकडा 1 ने वाढून 126 वर पोहोचला आहे. अद्याप एप्रिल-मे आणि जून महिन्यातील आकडे येणे बाकी आहे. जर हा आकडा 126 च्या वर गेला तर सरकार 'डीए'मध्ये 4 टक्क्यांची वाढ करू शकते. जर सरकारने 4 टक्के डीए वाढवला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्के ते 38 टक्क्यांपर्यंत होईल. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
1 जुलैपासून वाढून येणार Salary, होणार मोठा फायदा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm