पोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये 24 कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला;

पोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये 24 कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला;

belgavkar.com | belgaum | belgavkar

एक कोटी रुपयांचे नुकसान

क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावलेल्या एका पोस्टमास्टरने एक कोटी रुपये गमवावे

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावलेल्या मध्य प्रदेशातील एका पोस्टमास्टरने एक कोटी रुपये गमवावे आहेत. त्याने सट्टेबाजीसाठी तब्बल 24 कुटुंबांची 1 कोटी रुपयांची बचत पणाला लावल्याचा आरोप आहे. या कुटुंबांच्या मुदत ठेवीचे पैसे सागर जिल्ह्यातील सब पोस्ट ऑफिसमध्ये जमा करायचे होते. पण पोस्टमास्तरने या पैशांचा सट्टा खेळला. बीना सब पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर विशाल अहिरवार यांना बीना रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) 20 मे रोजी अटक केली होती.
पोलिसांसमोर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, पोस्टमास्तरने बनावट एफडी खात्यांसाठी खरे पासबुक जारी केले आणि मागील दोन वर्षांपासून सर्व पैसे आयपीएल क्रिकेट सट्ट्यामध्ये गुंतवले. बीना जीआरपी स्टेशन प्रभारी अजय धुर्वे यांनी ही माहिती दिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडल्याने त्यांची अवस्था बिकट आहे.
“अटक करण्यात आलेल्या सब पोस्टमास्टर विशाल अहिरवारवर आता कलम 420 आयपीसी (फसवणूक) आणि 408 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासाच्या निकालाच्या आधारे, या प्रकरणात आणखी कलमे लावली जाऊ शकतात,” असे बीना-जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय धुर्वे यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, विशाल अहिरवारवर बीनापूर्वी सागर जिल्ह्यातील खिमलासा येथे तैनात होते. आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आले. यातील एका पीडितेने सांगितले की, “कोविडमुळे मी पती आणि सासरे गमावले आहेत. माझ्या पतीने मृत्यूपूर्वी 9 लाख रुपये जमा केले होते. परंतु मला नुकतेच विशाल अहिरवारच्या फसवणुकीची माहिती मिळाली आहे. यानंतर मी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो, तिथे मला सांगण्यात आले की मुदत ठेव खाते क्रमांक अस्तित्वात नाही. माझे पती आणि सासरे आता हयात नाहीत, मला आता काय करावे हे समजत नाही.”

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पोस्टमास्तरने आयपीएल सट्टेबाजीमध्ये 24 कुटुंबांच्या एफडी लावल्या पणाला;
एक कोटी रुपयांचे नुकसान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm