बेळगाव : देशपांडे गल्लीतील मारहाणीत मृत्यू;
तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : दोन महिन्यांपूर्वी वृद्धाला क्षुल्लक भांडणातून मारहाणीत जखमी झालेल्या 60 वर्षीय वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला. विजय दत्ता आग्रे (रा. देशपांडे गल्ली) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मृताचा भाऊ संजय दत्ता आग्रे (वय 57), त्याची पत्नी संध्या (वय 52) व मुलगा अविनाश (27, तिघेही रा. देशपांडे गल्ली, बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. देशपांडे गल्लीतील घरासमोर सायकल पार्क केल्याच्या कारणावरून वरील तिघांनी विजय यांना 18 मार्च रोजी मारहाण केली होती.
त्यामुळे ते जखमी अवस्थेत घरात होते. मात्र, मंगळवारी त्यांचा अचानक मृत्यू झाला. यापूर्वी खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. 18 मार्च रोजी येण्या-जाण्याच्या रस्त्यात सायकल का लावली म्हणून विजय यांनी भावाशी भांडण काढले. यातून झटापट होऊन भाऊ व पुतण्या अविनाश यांनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी ते आधी सायकलीवर पडले व त्यानंतर झटापटीत त्यांना अंतर्गत मार लागला. त्यांच्यावर आधी खासगी त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार केले. तरीही तब्येतीत सुधारणा न झाल्याने सध्या ते घरीच होते. मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक दिलीप निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : देशपांडे गल्लीतील मारहाणीत मृत्यू; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm