बेळगाव : आगीत होरपळलेल्या हॉटेलमालकासह दोघांचा मृत्यू

बेळगाव : आगीत होरपळलेल्या हॉटेलमालकासह दोघांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : येथील राष्ट्रीय महामार्गावरील सहारा हॉटेलमध्ये 20 मे रोजी आगीच्या भडक्यात सहा दिवसांपूर्वी हॉटेलमालकासह पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा मंगळवारी उपचारावेळी मृत्यू झाला. हॉटेलमालक याकूब महंम्मद कडीवाल (रा. गुजरात ) व अक्रम ऊल हक (रा. बिहार) अशी मृतांची नावे आहेत. सहारा हॉटेलमध्ये गुरुवारी रोटीच्या भट्टीजवळ आगीने पेट घेतला. या आगीने याकूब कडीवाल, अक्रम ऊल हक यांच्यासह मुशर्रफ शिखा, महंम्मद अन्वर, महंम्मद आझाद शिखा यांना लपेटले.
एकमेकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सर्वांना इजा झाली. याकूब कडीवाल आणि अक्रम ऊल हक यांना 98 टक्के भाजले होते. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील रुग्णालयात हलविले होते. याकूब व अक्रम यांचा मृत्यू झाला. याकूब कुटुंबीयांसह प्रगतीनगरात वास्तव्यास होता. गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाल्याचा संशय आहे. मुशर्रफ शिखा, महंम्मद अन्वर, महंम्मद शिखा यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची नोंद श्री बसवेश्वर चौक पोलिस स्थानकात झाली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आगीत होरपळलेल्या हॉटेलमालकासह दोघांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm